कर बचत करत असताना सर्वसामान्य वर्गातील सर्वात लोकप्रिय आयकर सवलत देणारे कलम म्हणजे 80C होय. बऱ्याच जणांना 80C कलमाबद्दल संपूर्ण किंवा व्यवस्थित माहिती नसते. या लेखात आपण 80C बद्दल सविस्तर माहिती जाणून घेवूया.
80C कलम म्हणजे काय?
80C अंतर्गत कोणकोणत्या उपकलमांचा समावेश होतो?
Section No (आयकर कलम) | सवलतीस पात्र असणारी गुंतवणूक |
---|---|
80C | 1. सुकन्या समृद्धी योजना 2. Public Provident Fund (PPF) 3. राष्ट्रीय बचत पत्र (NSC) 4. जेष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) 5. ULIPS 6. Employee Provident Fund. 7. गृहकर्जाचे मुद्दल भरत असलेला कर्जाचा हप्ता. 8. जीवन विमा प्रीमियम (Life Insurance Premium) 9. Equity Linked Scheme. इत्यादी. |
80CCC | पेंशन योजनेसाठी केलेली गुंतवणूक. |
80CCD(1) | राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS), अटल पेन्शन योजना. |
80CCD(1B) | राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) मध्ये स्वतःची 50000 गुंतवणूक (ही रक्कम 1.5 लाखाव्यतीरिक्त ज्यादा सवलतीस पात्र असेल) |
80CCD(2) | राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) मध्ये फक्त नोकरदार असलेल्या व्यक्तीचे त्याच्या संस्थेकडून पगाराच्या 10% गुंतवणूक सवलतीस पात्र असेल. (सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 14%) |
(अद्यावत: 30 जुलै 2023 पर्यंत, 80CCD(1B) व 80CCD(2) बद्दल खाली उदाहरणासाहित सविस्तर लिहिले आहे)
80CCD(1B) चे उदाहरण;
तुम्हाला माहीत आहे का?
80C अंतर्गत मिळणारी आयकर सवलत ही फक्त जुन्या आयकर रचनेमध्ये (Old Tax Regime) निवड करणाऱ्या वर्गासाठी लागू आहे. एखाद्या व्यक्तीने नवीन आयकर रचनेची (New Tax Regime) निवड केल्यास 80C अंतर्गत येणारी कोणतीही सवलत त्याला मिळणार नाही. त्यामुळे आयकर रचनेची निवड करताना काळजीपूर्वक निवड करणे खूप गरजेचे आहे. |
80CCD(2) चे उदाहरण;
80CCD(2) हे कर सवलीतीच्या दृष्टीने दुसरे आणि अत्यंत महत्वाचे कलम आहे. 80CCD(2) हे फक्त नोकरदार किंवा पगारदार वर्गाला लागू आहे. तुम्हाला तुमची संस्था किंवा कंपनी ज्यावेळेस पगार देते, त्या पगारापैकी 10% रक्कम (Basic + DA) 80CCD(2) कलमा अंतर्गत कर सवलत घेण्यासाठी पात्र असते. यालाच आपण इंग्रजीमध्ये Employer’s Contribution असे म्हणतो. हीच सवलत राज्य सरकार व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 14% आहे. 80CCD(2) मध्ये मिळणारी सवलत 80CCD(1B) सवलतीच्या व्यतिरिक्त आहे. याचाच अर्थ, 80CCD(2) लागू असलेल्या मर्यादेचा प्रभाव 80CCD(1B) च्या कलमातील गुंतवणुकीपेक्षा वेगळा आणि स्वतंत्र आहे.
निष्कर्ष
80C कलम हे नोकरदार वर्गांसाठी कर सवलतीचा उत्तम पर्याय म्हणून सिद्ध झाला आहे. सहसा पारंपरिक गुंतवणूक करणाऱ्यांसाठी 80C कलम वरदान ठरले आहे. अलीकडे नवीन आयकर रचना (New Tax Regime) चालू झाल्यानंतर त्यामध्ये 80C कलमा अंतर्गत कोणतीही सूट मिळत नाही, हे सर्वश्रुत असल्यामुळे अनेकजण जुन्या आयकर रचनेला (Old Tax Regime) प्राधान्य देत आहेत. ELSS सारखे काही गुंतवणुकीचे प्रकार तीन वर्षापेक्षा जास्त लॉकइन असले तरी आयकर सवलत घेण्यासाठी 80C अंतर्गत येतात. त्यामुळे, फक्त कराच्या दृष्टीने याचे वेगळेपण नसून जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्यासाठीही ही गुंतवणूक उपयुक्त ठरत आहे.
FAQs- 80C Frequently Asked Questions- नेहमी विचारले जाणारे प्रश्न
80C कलम आयकरमधून सवलत घेण्यासाठी आहे. 80C कलमा अंतर्गत 1.5 लाख रुपयाची गुंतवणूक दाखवून वैयक्तिक अथवा HUF वर्गातील लोक आयकर सूट घेवू शकतात.
नाही. नव्या कररचनेत (New Tax Regime) 80C आयकर सवलत घेता येत नाही.
होय. ELSS मध्ये गुंतवणूक केल्यास 80C अंतर्गत आयकर सवलत मिळते
80C आयकर कलमाची कर सवलत घेण्याची मर्यादा वार्षिक 150000/- रुपये अशी आहे. त्यामुळे तुमचा 50000/- जीवन विम्याचा हप्ता कमाल मर्यादा 150000/- पर्यंत असल्यामुळे सर्व रकमेचा लाभ घेण्यास पात्र आहात. 80C कलम कशासाठी आहे?
नव्या कररचनेत 80C आयकर सवलत घेता येते का?
ELSS मध्ये गुंतवणूक केल्यास 80C आयकर सवलत मिळते का?
माझा जीवन विमा हप्ता वार्षिक 50000 असल्यास मी कितीपर्यंत 80C अंतर्गत सवलत घेवू शकतो?
हेही नक्की वाचा >> जीवन विमा आणि त्याचे प्रकार