आमच्या विषयी..

  • बँकिंग, टॅक्स, विमा, गुंतवणूक, कर्जे, व्यवसाय, आर्थिक घडामोडी, विविध सरकारी योजना इत्यादी गोष्टींची नेमकी आणि अचूक माहिती उपलब्ध करून आर्थिक जागरूकता निर्माण करणे हे अर्थसंपदाचे पहिले आणि महत्त्वाचे उद्दिष्ट्य आहे. आर्थिक साक्षरतेचे धडे मातृभाषेत उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसंपदा (www.arthasampada.com) ब्लॉगचा जन्म झाला. इन्कम टॅक्स ते  घरातील खर्च आणि बचतीचे प्रत्यक्ष व्यवहार समजून घेण्यासाठी इंग्लिश आणि हिंदीमध्ये बहुसंख्य ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत. सोप्या भाषेत मराठीतून आर्थिक संकल्पना समजावून सांगणारे अर्थसंपदा हे पहिले वहिले वेब संकेत स्थळ आहे.
  • आर्थिक सल्ला आणि आर्थिक जागरूकता या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्यामुळे अर्थसंपदा कोणताही आर्थिक सल्ला किंवा सेवा देत नाही. आर्थिक साक्षर होणे म्हणजेच आर्थिक ज्ञानाचे धडे सोप्या भाषेत समजून घेणे किंवा जागरूक राहणे होय. अर्थसंपदा टीम याच तत्त्वावर काम करत असून आर्थिक माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अर्थसंपदाच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रातील घडामोडी, त्यामधील संकल्पना वाचकास अर्थ जागरूकतेसाठी उपयुक्त ठरतील यात शंका नाही. अर्थसंपदा ब्लॉग अधिक सक्षम करण्यासाठी आपल्या सूचना, प्रश्न अभिप्राय जरूर कळवा.

सूचना, प्रश्न आणि अभिप्राय कळवण्यासाठी आमच्याशी संपर्क करा