क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना बऱ्याच जणांना क्रेडिट कार्ड कसे काम करते याची माहिती नसते. भारतात जवळपास 7.5 कोटीहून अधिक सक्रिय क्रेडिट कार्ड आहेत. त्यामध्ये एका पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे. क्रेडिट कार्ड घेताना आपणाला सर्व गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे, अन्यथा फायदा कमी नुकसानच जास्त होण्याची शक्यता असते. सहसा बँका पात्र नोकरदार किंवा व्यावसायिकांना क्रेडिट कार्ड देतात. उत्पन्नाची नियमित हमी असेल तर बँका ऑनलाईन पद्धतीने सोपस्कार पार पाडतात. कार्ड घेतल्यानंतर त्याचा योग्य पद्धतीने वापर होण्यासाठी खालील गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.
क्रेडिट कार्डचे प्रकार
क्रेडिट कार्डच्या थेट मर्यादेव्यतिरिक्त बँका किंवा कंपन्या कॅश लाईन ऑफ क्रेडिट किंवा कॅश ॲडव्हांस देण्यासाठी सदैव तत्पर असतात, पण त्यासाठी शुल्काच्या स्वरूपात मोजावी लागणारी किंमत देखील जास्त असते. अशा वेळेस अगदी मेडिकल किंवा इतर आवश्यक गरज असेल तरच या पर्यायाचा वापर करावा. क्रेडिट कार्डचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकार खालीलप्रमाणे;
- नेहमीचे वापरले जाणारे Regular Credit Card
- विद्यार्थ्यासाठी Student Credit Card
- राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांसाठी Travel Credit Card
- व्यवसायिक किंवा व्यापार करणाऱ्यांसाठी Business Credit Card
- नेहमी खरेदी करणाऱ्यांसाठी Shopping किंवा Reward Credit Card
- बचत करणाऱ्यांसाठी Cashback Credit Card
- कर्जाच्या हफ्त्यासाठी वापरले जाणारे EMI Credit Card
- अत्याधुनिक RFID तंत्रज्ञानाचा वापर करून वापरले जाणारे Contactless Credit Card
क्रेडिट कार्ड बिलिंग सायकल
क्रेडिट कार्ड शुल्क
आवश्यकतेनुसार वापर
आर्थिक शिस्तीचे पहिले चांगले लक्षण म्हणजे आवश्यक असेल तरच खर्च करणे होय. क्रेडिट कार्डचा योग्य वापर केल्यास सिबिल स्कोअर चांगला राहण्यास मदत होईल. उदा. देय दिनांक न चुकता क्रेडिट कार्ड बिल भरले गेल्यास उत्तम क्रेडिट इतिहास (Credit history) तयार होण्यास मदत होते.
खर्चाचे प्रमाण आणि उपयुक्तता
- क्रेडिट कार्ड सुविधा आणि इतर माहिती
- क्रेडिट कार्डवर अनेक सुविधा असतात ज्याची आपल्याला फार कमी माहिती असते. जसे की,
- EMI किंवा एखादी वस्तू हफ्त्यामध्ये घेण्याची सुविधा
- बोनस, कॅशबॅक आणि फायदेशीर ऑफर्स
- अपघाती किंवा आकस्मिक मृत्यू विमा
- RFID तंत्रज्ञान किंवा इतर सुविधा
- प्रवास किंवा हॉटेलिंग करताना क्रेडिट कार्ड सलग्नित कंपण्याद्वारे देण्यात येणाऱ्या ऑफर्स