जीवन विमा किंवा लाइफ इन्शुरन्स एक असा करार आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला त्याने नोंदणी केलेल्या अधिकृत विमा कंपनीकडून ठरलेल्या रकमेच्या किंवा हफ्त्याच्या बदल्यात ठराविक कालावधीसाठी आर्थिक संरक्षण दिले जाते. विमा कंपनीला दिलेल्या हफ्त्याला ‘प्रीमियम‘ असे संबोधले जाते. सर्वसाधारणपणे हा हफ्ता मासिक, सहामाही, वार्षिक किंवा एक रकमीसुद्धा असू शकतो. उदा. एखाद्या व्यक्तीने प्रीमियम देवून जीवन विमा निवडला असेल तर त्याला त्याच्या मृत्यूपूर्वी किंवा मृत्यूच्या पश्चात ठरलेल्या योजनेनुसार आर्थिक भरपाई दिली जाते.
जीवन विम्याचे प्रकार(Types of Life Insurance)
काही योजना परिपक्व मनीबॅक असतात, तर काही नुसत्या मनिबॅक नसून विमाधारक व त्याच्या वारसाला भरपाई देणाऱ्या असतात. काही महत्त्वपूर्ण जीवन विमा पॉलिसीचे प्रकार आपण पाहुयात.
काही शब्दांना इंग्लिशव्यतिरिक्त भाषेमध्ये रूपांतर केल्यास समजण्यास कठीण जावू शकते म्हणून प्रचलित असलेल्या भाषेचा, टर्मचा कंसामध्ये जसाच्या तसा उपयोग केला आहे.
टर्म इन्शुरन्स किंवा मुदत विमा (Term Insurance)
एका विशिष्ट कालावधीत अकाली मृत्यू झाल्यास मृत्यू पश्चात कुटुंबीयांना किंवा वारसांना दिल्या जाणाऱ्या विमा कवच भरपाईला टर्म इन्शुरन्स (Term Insurance) म्हणतात. सहसा रिटर्न योजना सोडल्यास यामध्ये दिली जाणारी विमा भरपाई ही नेहमी विमाधारकाच्या वारसाला किंवा कुटुंबीयांना दिली जाते.
फायदे
- इतर विमा योजनेच्या तुलनेत यामध्ये कमी प्रीमियममध्ये जास्त सुरक्षा कवच भेटते.
- पूर्ण विमा कालावधीमध्ये प्रीमियम सारखाच असल्यामुळे आर्थिक भुर्दंड कमी बसतो. म्हणूनच मुदत विमा योजना जितक्या लवकर सुरू होईल तितका जास्त फायदा होतो.
- मुदत विमा योजनेमध्ये पूर्ण विम्याचे हफ्ते किंवा प्रीमियम एकरकमी भरण्याचे पर्याय उपलब्ध असतात.
संपूर्ण जीवन विमा (Whole Life Insurance Policy)
मुदत विम्यासारखीच पण संपूर्ण जीवन किंवा मरेपर्यंत विमाधारकाला सुरक्षा कवच देणारी योजना म्हणजेच संपूर्ण जीवन विमा होय. यामध्ये विमाधारकाच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारसास किंवा कुटुंबास विम्याची रक्कम देण्यात येते. नावाप्रमाणेच, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत विमा कवच देणारी आणि कोणत्याही मुदतीची अट न ठेवणारी ही योजना अनेक लोकांच्या पसंतीस उतरली आहे.
फायदे
- संपूर्ण जीवनाचे कवच म्हणजेच कोणत्याही मुदतीची सिमा लागू होत नाही.
- विम्याच्या ठराविक कालावधीनंतर जमलेल्या रकमेवर काही कंपन्या कर्ज उपलब्ध करून देतात.
एंडोमेंट विमा (Endowment Insurance Policy)
एका ठराविक मुदतीसह भरलेल्या प्रिमियमचा किंवा हफ्त्याचा परतावा पैसे वाढवण्यासह आर्थिक सुरक्षेची हमी देणारा असेल तर त्याला Endowment Insurance Policy म्हणतात. उदा. एखाद्या व्यक्तीने 20 वर्षाचे जीवन सुरक्षा कवच घेतले असल्यास काही कंपन्या साठलेली संपूर्ण रक्कम विमाधारकास परत देण्यास तयार असतात तेंव्हा त्याला एंडोमेंट विमा म्हंटले जाते.
फायदे
- विम्याचा कालावधी संपल्यानंतर मॅच्युरिटी किंवा परिपक्व झालेली रक्कम विमाधारकास परत केली जाते. सहसा ही रक्कम विमा कवच घेतेवेळी निश्चित केलेली असते. बाजारातील कोणत्याही चढ-उताराचा या ठरलेल्या रकमेवर परिणाम होत नाही.
- काही कंपन्या मृत्यू पश्चातसुद्धा विमाधारकाच्या वारसास सुरक्षा कवच असलेली रक्कम व हफ्त्याची जमा झालेली रक्कम देतात, जे या विमा योजनेचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
- कोणत्याही जीवन विमा प्रकारात जास्त लवचिकता असलेली व निवडीचे जास्त पर्याय असलेली योजना म्हणून Endowment Insurance Policy प्रचलित आहे.
यूलिप्स(Unit Linked Insurance Plan-ULIPs)
विमा आणि गुंतवणुकीचे मिश्रण म्हणजे यूलिप्स होय. सहसा, यूलिप्समध्ये विमा कंपनीशी करार असलेल्या फंड हौउसला किंवा व्यवस्थापकला डेब्ट किंवा इक्विटि किंवा विमा योजनेनुसार गुंतवणूक करण्यास सांगितले जाते. काही रक्कम बचत स्वरूपात साठवली जाते. विमा योजना स्विकारताना एकरकमी रक्कम यूलिप्समध्ये गुंतवली जाते, जी योजनेचा करार संपल्यानंतर बाजारातील भावाप्रमाणे देय असते. विम्याच्या कराराप्रमाणे किंवा कालावधी पूर्ण होईपर्यंत जीवन विम्याचे संरक्षण आणि भरपाई देय असते.
फायदे
- यूलिप्सच्या योजनेत परतावा जास्त मिळण्याची शक्यता असते.
- यूलिप्समध्ये एकरकमी गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूक व जीवन विमा कवच/संरक्षण याचा संतुलित लाभ घेता येतो, ज्याला काहीजण Diversified किंवा विविधिकरण पोर्टफोलियोमध्ये गणतात.