महिला सन्मान बचत प्रमाणपत्र- Mahila Sanman Saving Certificate- MSSC

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 2023-24 च्या अर्थसंकल्पात महिला सन्मान बचत प्रमाणपत्र म्हणजेच Mahila Sanman Saving Certificate-MSSC योजना जाहीर केली होती. ही योजना महिला आणि मुलींसाठी आर्थिक बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचे स्वरूप

ही योजना दोन वर्षे म्हणजेच 2023-25 पर्यंत उपलब्ध असणारी योजना असून महिला किंवा मुलींना जास्तीत जास्त दोन लाख रुपये दोन वर्षासाठी ठेवता येणार आहेत. तसेच, याचा व्याजदरसुद्धा निश्चित स्वरूपाचा असून मुदत संपेपर्यंत त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र – Mahila Sanman Saving Certificate-MSSC पात्रता

18 वर्षांवरील मुली आणि महिला यासाठी पात्र आहेत. 18 वर्षाखालील अज्ञान मुलींच्यावतीने पालकांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र- Mahila Sanman Saving Certificate-MSSC खाते काढता येते.

व्याजदर

दोन वर्षासाठी सध्याचा निश्चित व्याजदर 7.5 % असून तिमाही चक्रवाढ पद्धतीने गणला जाणारा आहे, जो योजनेची मुदत संपल्यानंतर देय असेल.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची वैशिष्ट्ये

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, 2023 ची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत

मुदतीची मर्यादा

या योजनेमध्ये दोन वर्षाचा बंदिस्त कालावधी असून दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खाते परिपक्व होईल व मुदत ठेव योजनेतील पैसे देय असतील

मुदत ठेव पैसे मर्यादेमध्ये सुलभता

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र – Mahila Sanman Saving Certificate (MSSC) मध्ये तुम्हाला कमीत कमी 1000 रुपयांपासून 100 रुपयांच्या पटीत जास्तीत जास्त 2,00,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. एक किंवा अनेक खात्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा पर्याय उपलब्ध असला तरी सर्व खात्यामधील रक्कम 2 लाखापेक्षा जास्त ठेवता येणार नाही. तसेच एक खाते उघडल्यानंतर दुसऱ्या खात्यासाठी तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. याचाच दुसरा अर्थ, दोन खात्यांमध्ये तीन महिन्यांचे अंतर ठेवावे लागणार आहे.

मुदतीपूर्वी पैसे काढण्याची सोय

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र – Mahila Sanman Saving Certificate -MSSC मधून मुदतीपूर्व पैसे काढण्यासाठी किमान एक वर्षाचा गुंतवणूक कालावधी पूर्ण करणे गरजेचे आहे. एक वर्ष झाल्यानंतर खात्यातील 40% रक्कम काढता येईल.

खात्रीशीर परतावा

व्याजाची निश्चित हमी व सरकारने जाहीर केलेली योजना असल्यामुळे यामध्ये खात्रीशीर परतावा मिळणार आहे.
mahila-sanman-saving-certificate-mssc

निष्कर्ष

बाजारातील इतर अनेक योजनांचा अभ्यास केल्यास, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र – Mahila Sanman Saving Certificate-MSSC ही सरकार पुरस्कृत असून दोन वर्षाच्या कालावधीत बँका आणि इतर समकक्ष संस्थांच्या तुलनेत निश्चित 7.5% व्याजदर व खात्रीशीर परतावा देणारी योजना आहे.

FAQ- नेहमी विचारले जाणारे प्रश्न

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र - Mahila Sanman Saving Certificate-MSSC खाते कोठे काढता येईल?

जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा योजनेशी सलग्नीत असणाऱ्या कोणत्याही बँकेत हे खाते उघडता येते.

दोन वर्षाच्या आत खाते बंद करता येईल का?

होय. पण योग्य कारणाशिवाय खाते बंद केल्यास दंड म्हणून व्याजदरात 2% कपात होईल. म्हणजेच खाते बंद करताना 7.5 ऐवजी 5.5% व्याजदर मिळेल. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र - Mahila Sanman Saving Certificate-MSSC खातेदाराचा मृत्यू झाल्यास किंवा अपघाती व अकाली अपंगत्व आल्यास योग्य कागदपत्रांची पूर्तता करून खाते बंद करता येवू शकते.

ही योजना अज्ञान मुलांसाठी आहे का?

वरती एका ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र - Mahila Sanman Saving Certificate-MSSC योजनेमध्ये फक्त महिला आणि अज्ञान मुलींच्यावतीने त्यांच्या पालकांना खाते उघडता येते.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र - Mahila Sanman Saving Certificate-MSSC खात्यांमध्ये कर सवलत मिळते का?

5 एप्रिल 2025 रोजी अर्थमंत्रालयाने काढलेल्या एका पत्रकात म्हंटले आहे की ही योजना कर सवलत देत नाही.

Leave a Comment