महत्वपूर्ण माहिती- रिझर्व्ह बँकेचा नवीन नियम, RBI चे नवीन परिपत्रक, डेबिट व क्रेडिट कार्ड नेटवर्क बदल इत्यादी.
रिझर्व्ह बँकेने डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक काढले असून कार्डधारकांना प्रस्थापित नेटवर्क असलेल्या कंपन्यांची निवड करण्याचे स्वातंत्र्य देण्यासंबंधी सूचना व अभिप्राय मागवण्यात आले आहेत.
रिझर्व्ह बँक RBI चे महत्त्वपूर्ण पाऊल
अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपण आपले खाते ज्या बँकेत किंवा फायनान्स कंपनीत आहे त्या ठिकाणी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सेवा घेत असाल तर बँका व फायनान्स कंपन्या त्यांचा करार असलेल्या किंवा संलग्नित असलेल्या नेटवर्क कार्डची सेवा घेण्यासाठी आग्रह करताना दिसून असतात. उदा. Master Card किंवा Visa Card इत्यादी कोणत्याही कंपनीचे उपलब्ध असेल ते कार्ड ग्राहकाला दिले जातो ज्यामध्ये ग्राहकाला ते निवडण्याचे अधिकार नसतात. याचा परिणाम असा होतो की काही POS म्हणजेच पॉइंट ऑफ सेलमध्ये ठराविक कार्ड स्वीकारली जात नाहीत व ग्राहकाला याचा भुर्दंड सोसावा लागतो याची कल्पना रिझर्व्ह बँकेला होती.
रिझर्व्ह बँकेकडून कोणते नवीन बदल होणार?
वरती उल्लेख केल्याप्रमाणे कार्ड कंपनी निवडीचे स्वातंत्र्य ग्राहकास देण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्नशील आहे. सध्या VISA, Rupay, Master Card इत्यादी कंपन्यांचे कार्ड प्रचलित आहेत. ग्राहक ज्यावेळेस कार्ड घेण्यासाठी अर्ज करेल तेंव्हा त्याला कोणते कार्ड निवडायचे हे अगोदरच समजले पाहिजे. तसा पर्याय ग्राहकाचे खाते असलेल्या बँकेकडून किंवा संस्थेकडून उपलब्ध करून दिला पाहिजे यासाठी रिझर्व्ह बँक सक्ती करण्याची शक्यता आहे.
तुम्हाला माहीत आहे का?
अलीकडील एका आकडेवारीनुसार एका महिन्याला जवळपास एक लाख कोटीहून अधिक क्रेडिट कार्ड पेमेंट होत आहेत जे भारताच्या विकसनशील व्यवस्थेसाठी पर्चेसिंग पॉवर वाढीचा संकेत देत आहेत.
रिझर्व्ह बँक RBI ने बदल केल्यास काय फायदा होईल?
- ग्राहकाला त्याच्या पसंतीचे व सोयीचे कार्ड मिळणार. तशी कंपनी निवडता येणार. त्यासाठी ग्राहकाला कार्ड नूतनीकरण करताना किंवा नवीन खाते उघडल्यानंतर अर्ज करतानासुद्धा हा पर्याय उपलब्ध असेल.
- बँकांना आणि कार्ड वितरित करणाऱ्या कंपन्यांना सर्व प्रकारच्या कार्डचा पर्याय ठेवणे बंधनकारक असेल.
- बँकां विशिष्ठ एका कंपनीची सेवा देण्यासाठी ग्राहकाला आग्रह करणार नाहीत.
- कोणत्याही प्रकारच्या खरेदीसाठी किंवा पेमेंट करण्यासाठी कार्ड नेटवर्क व त्याची सुविधा महत्वाची असते. सुलभ व्यवहार करण्यासाठी नेटवर्क टर्मिनल प्रवेश अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. Visa कार्डसाठी असलेली सुविधा Master Card मध्ये असेलच असे नाही. नव्या नियमांमुळे हवे ते नेटवर्क कार्ड मिळवता येईल व सुलभ व्यवहार होण्यास मदत होईल.
RBI लावणार परकीय मक्तेदारीला चाप
Rupay कार्ड हे स्वदेशी कार्ड नेटवर्क असल्यामुळे जास्तीत जास्त त्याचा उपयोग केला जावा असे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे असून परकीय कार्ड नेटवर्क कंपन्यांवर अवलंबून असलेल्यांसाठी हा इशारा देण्यात आला आहे. डिजिटल पेमेंट करताना कोणताही अडथळा निर्माण होवू नये म्हणून हे पाऊल उचलले असल्याचे समजते.
रिझर्व्ह बँकेने याअगोदरही Mastercard, Diners Club आणि American Express सारख्या परकीय कंपन्यांना अनियमितता आढळून आल्यामुळे बंदी घातली होती जी नंतर उठवण्यात आली होती.