घर खरेदीचे नियोजन: बँकेची व कर्जाची निवड कशी कराल? होम लोन कागदपत्रे, पात्रता आणि इतर महत्वपूर्ण गोष्टी..!

महत्वपूर्ण माहिती- घर खरेदी योजना, होम लोन पात्रता, होम लोन EMI व कागदपत्रे, होम लोन व्याजदर व बँकांचे निकष, होम लोनसाठी सर्वोत्कृष्ट बँक [Best home loan bank], आणि कर्जाची निवड, होम लोन संपूर्ण माहिती, होम लोन FAQs इत्यादी.

ज्यावेळेस आपण स्वप्नातले घर घेण्याचे निश्चित करतो तेंव्हा सर्वात आधी मनात विचार येतो तो म्हणजे गृह कर्जाचा. घर घेण्यासाठी पैसे उभा करणे ही तितकी सोपी गोष्ट नाही याची जाणीव अनेकजणांना असली तरी गृह कर्ज घेताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर नियोजन करण्यास काहीच अडचण येणार नाही.

Table of Contents

घर खरेदीचे नियोजन करताना कोणत्या बाबी लक्षात घ्याल?

घर खरेदी खरणे हे आर्थिक आणि सामाजिक समृद्धीचे लक्षण समजले जाते. बहुंसंख्य वर्ग एकापेक्षा अनेक घर खरेदी करताना विचार करतो. सुरुवातीस पहिले घर घेतानाच भरमसाठ खर्च होण्याची शक्यता असल्यामुळे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. काही गोष्टी या वर वर दिसत असतात तशा प्रत्यक्ष तितक्या सोप्या नक्कीच नसतात. उदा एखादा नोकरदार किंवा व्यावसायिक घर खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला या प्रक्रियेतील व्यावहारिक पैलूंचा अभ्यास असला पाहिजे अन्यथा घर खरेदी केल्यानंतर अडचण निर्माण होवू शकते.
काही महत्वपूर्ण गोष्टी खालीलप्रमाणे;

घर खरेदी-गुंतवणूक की गरज?

घर खरेदी करताना सर्वात पहिला आणि महत्वाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे घर खरेदी ही गरज आहे की गुंतवणूक याचा विचार करणे गरजेचे आहे. अनेकजण घर हे सामाजिक आणि कौटुंबिक आधार म्हणून भावनिक नजरेतून याकडे पाहतात. तर काहीजण गुंतवणूक म्हणून घर खरेदीला प्राधान्य देतात. गुंतवणुक करण्यासाठी शहरातील ठिकाणे निवडली जातात. उदा. पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी घर खरेदी केल्यास गुंतवणूक व गरज असा दोन्ही बाजूंनी सोयीनुसार फायदा होवू शकतो.

मासिक उत्पन्न आणि क्षमता

घर खरेदी करण्यापूर्वी आपले मासिक उत्पन्न किती आहे किंवा आपल्या आवडीच्या ठिकाणी घर घेण्यासाठी पुरेशी आर्थिक क्षमता आहे का हे तापासणे गरजेचे आहे. उत्पन्नातील किती वाटा हा घर खरेदी करण्यासाठी वापरला जाणार आहे याचा अगोदरच साधक बाधक विचार करून ठेवला पाहिजे. उदा. 50 लाखाचे घर खरेदी करणार असाल व त्यासाठी कर्जाची आवश्यकता असेल तर किमान 5-7 लाख रुपये कर्जाच्या रकमेव्यतिरिक्त स्वतःकडे असायला हवेत.

सुरक्षित जॉब किंवा व्यवसाय

घर घेताना बँका स्पर्धात्मक व्याजदर देतात म्हणून अनेकांचा कर्ज काढण्याकडे ओढा असतो. याला नोकरदार किंवा व्यवसायिक अपवाद नाहीत. नोकरदार असाल तर किमान पुढची 10-15 वर्षे सुरक्षित आणि जॉब न सोडता उत्पन्न येत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. हाच नियम व्यवसाय करणाऱ्यांना लागू होतो. व्यवसायामध्ये चढ उतार असले तरी सध्या जेवढे उत्पन्न कर्जासाठी पात्र आहे त्यापेक्षा कमी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

सद्यस्थितीत असलेली कर्जे

बऱ्याच जणांचा दुर्लक्षित होणारा घटक म्हणजे सद्यस्थितीत असलेली कर्जे होय. अनेकजण सध्याच्या कर्जाचे हफ्ते चालू असतानाच दुसऱ्या कर्जाचा विचार करतात. समजा एखाद्याचे वैयक्तिक कर्ज चालू असेल तर त्याचा हफ्ता जास्त असण्याची शक्यता आहे कारण वैयक्तिक कर्जाचा व्याजदरही जास्त असतो. त्यामुळे सर्वप्रथम असली कर्जे फेडण्याला प्राधान्य दिले पाहिजे अन्यथा घर घेण्याचे नियोजन करत असताना आर्थिक गणित बिघडू शकते.

आवश्यक असलेला राखीव निधी

फक्त घर खरेदी करायचे आहे म्हणून सगळे पैसे पणाला लावणे योग्य नाही. याचा अंदाज काढताना राखीव निधी किती असला पाहिजे याचा अभ्यास करणे गरजेचा आहे. उदा. घर घेतल्याबरोबर फर्निचर आणि देखभाल खर्चाचे नियोजन, बरीच रक्कम घर खरेदीसाठी खर्च होणार असल्याने आपत्कालीन परिस्थितीत निर्माण होणारे खर्च इत्यादी गोष्टींचा विचार व्हायला हवा. त्यासाठी राखीव व नियोजित पैश्याचे अगोदरच नियोजन करून ठेवावे.

घराचे ठिकाण आणि कनेक्टिव्हिटी

वरील गोष्टींचा विचार केल्यानंतर व घर घेण्याचा पक्का निर्णय झाल्यानंतर वेळ येते ती म्हणजे घर घेताना कोणत्या ठिकाणास प्राधान्य द्यावे. तुम्ही एखाद्या शहरात नोकरीनिमित्त अनेक वर्षे राहत असाल तर त्या ठिकाणी घर घेण्याचा विचार करू शकता, ज्यामुळे नोकरीबरोबर बाजार आणि शहरातील कनेक्टिव्हिटी याचा योग्य समतोल साधता येईल. तुलनेने अशाप्रकारच्या लोकांना (नोकरदारांना) व व्यवसाय करणाऱ्यांना घर घेणे सोपे जाते. याउलट, नोकरी किंवा व्यवसायाचे ठिकाण सारखे बदलत असेल तर अनेकजण गुंतवणुकीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढीसाठी घर खरेदी करतात. घर खरेदी करताना हॉस्पिटल, शाळा, विद्यालये, मार्केट इत्यादी गोष्टींचा आवश्य विचार करावा.

बजेट आणि गृह कर्जाची तयारी

घर खरेदी करण्यासाठी सर्वात महत्वाचा आणि निर्णायक टप्पा म्हणजे बजेट ठरवणे होय. तुमचे बजेट जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत घर खरेदीचा निर्णय होवू शकत नाही हे सर्वश्रुत आहे. घर खरेदीचा निर्णय हा घाई गडबडीत घेण्यासारखा निर्णय नाही, अन्यथा फायद्यापेक्षा तोटाच जास्त सहन करावा लागू शकतो हे आवर्जून सांगावेसे वाटते. एकदा बजेट ठरवल्यावर किंवा त्यासाठी कर्ज घेण्याचा विचार केल्यानंतर काही प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. उदा.

  • घर खरेदी करण्यासाठी गृह कर्जासाठी काय पात्रता असते?
  • कर्ज देताना बँकांचे नियम व त्यासंबंधीच्या अटी तुम्हाला माहीत आहेत का?
  • बँका सहज कर्ज उपलब्ध करून देत आहेत काय?
  • बँका कोणत्या प्रकारच्या घरासाठी कर्ज उपलब्ध करून देतात?
  • घर खरेदीची रक्कम आणि बँका देत असलेल्या कर्जाची रक्कम पुरेसी आहे काय?
  • आपण जे घर घेणार आहे त्यासाठी शासनाच्या काही सवलती आहेत का? त्यासाठी बँक सहकार्य करते का?
  • गृह कर्जाचा कालावधी आणि व्याजदर यांची तुलना केली आहे का?
  • गृह कर्जाचा हफ्ता आणि तुमचे उत्पन्न याचा ताळमेळ आणि त्यासाठी आवश्यक असलेली पात्रता याची चौकशी केली आहे काय?
  • गृह कर्ज घेताना एकट्या नावाने की घरातील दुसऱ्या सदस्याबरोबर संयुक्त कर्जाला प्राधान्य देणार असाल तर तसा निर्णय झाला आहे का?
वरील प्रश्नांची समाधानारक उत्तरे तयार झाल्यावरच बँक आणि कर्जाची निवड करण्यासाठी तुम्ही पात्र असाल हे वेगळे सांगायची गरज नाही.

तुम्हाला माहीत आहे का?

गृह कर्ज किंवा होम लोनचे व्याजदर हे इतर कोणत्याही कर्जाच्या व्याजदारपेक्षा नेहमी कमी असतात. तसेच सरकारी कर संरचनेत होम लोनला विशेष सवलत असल्यामुळे कर्जाची मुद्दल, व्याज, स्टॅम्प ड्यूटि इत्यादी घटकांना 80 C, 24 b सारख्या कलमांतर्गत सूट मिळते.

होम लोनसाठी पात्रता (Home Loan Eligibility)

प्रत्येक बँकांचे नियम थोड्या प्रमाणात वेगवेगळे असले तरी होम लोन किंवा गृह कर्जासाठी सर्वसाधारणपणे खालील पात्रता ग्राह्य धरली जाते.

गृह कर्ज पात्रताआवश्यक निकष
वंय18-70
अनुभव 2 वर्षे
उत्पन्न महिना 20000 पासून पुढे
उत्पन्नाचे स्त्रोत वर्षे 2-3 वर्षे
कर्ज किती मिळेल बँकेच्या नियमानुसार
क्रेडिट स्कोअर 750+
रोजगार नोकरी किंवा व्यवसाय
हमीदार (Guarantor)बँकेच्या नियमानुसार

होम लोनसाठी बँक (Best home loan bank) आणि कर्जाची निवड कशी कराल?

होम लोनसाठी बँकेची निवड करताना अनेकदा आपल्याला पुरेसे ज्ञान नसते. काहीजण निवड करताना फक्त सहज कर्ज मिळते म्हणून बाजारातून चढ्या व्याजदराने नॉन बँकिंग संस्थेकडून कर्ज घेताना दिसून येतात. शक्यतो होम लोनसाठी बँक निवडताना राष्ट्रीयकृत बँकेला प्राधान्य द्यावे. याचे कारण असे की राष्ट्रीयकृत बँकेतील व्याजदर हे नेहमी स्पर्धात्मक आणि कमी असतात. अशाप्रकारचे कर्ज घेताना सरकारने जाहीर केलेल्या सर्व योजनांचा बँकावरती प्रभाव असतो. अलीकडेच रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार जवळपास सर्वच राष्ट्रीयकृत बँका आणि अनेक आघाडीच्या खाजगी व शेडुल्ड बँका रेपो दराशी लिंक असल्यामुळे व्याजदर माफक तर आहेतच पण अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे कर्ज निवडीचे स्वातंत्र्यसुद्धा आहे.

काही सर्वोत्कृष्ट होम लोन बँका आणि त्यांचे व्याजदर खालीलप्रमाणे;

Best home loan bank and their interest rates are as below;

सेंट्रल बँक ऑफ इंडिया 8.35 % पासून पुढे
बँक ऑफ इंडिया 8.45 % पासून पुढे
बँक ऑफ बरोदा8.60 % पासून पुढे
भारतीय स्टेट बँक8.70 % पासून पुढे
कोटक महिंद्रा बँक8.75 % पासून पुढे

होम लोन कागदपत्रे व घर खरेदीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

होम लोनसाठी लागणारी कागदपत्रे;
  1. कर्जाचा अर्ज म्हणजेच होम लोन Application form.
  2.  पासपोर्ट आकाराचे चार फोटो
  3. गेल्या सहा महिन्यातील बँक खात्याची स्टेटमेंट
  4. ओळखपत्र म्हणजेच Pancard, आधार कार्ड इत्यादी
  5. रहिवासी किंवा राहत असलेल्या पत्त्याचा पुरावा
  6. पगाराचे सर्टिफिकेट किंवा Salary Certificate.
  7. मागील 2-3 वर्षे फाईल केलेला आयटी रिटर्न पुरावा अथवा फॉर्म 16 (नोकरदारांना 2, तर व्यावसायिकांना 3 वर्षे)
  8. स्वयं रोजगार करणाऱ्यांनी advance टॅक्स भरला असल्यास त्याची चलने.
  9. व्यवसाय करणाऱ्यांनी त्यांच्या व्यवसाय करत असलेल्या ठिकाणाचा पत्त्याचा पुरावा.
  10. घर खरेदी संबंधित सर्व कागदपत्रे
घर खरेदी करताना लागणारी कागदपत्रे;
  1. Agreement किंवा करारपत्र
  2. Legal Search Report आणि Title search report
  3. प्रॉपर्टी टॅक्स सर्टिफिकेट
  4. Occupancy सर्टिफिकेट
  5. NOC म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट
  6. बिल्डिंग प्लॅन इत्यादी

निष्कर्ष

घर खरेदीचे नियोजन करताना वरील बाबींचा अभ्यास केल्यास कर बचतीबरोबर घर घेण्याचे स्वप्न अगदी सहज शक्य आहे. सरकारी सवलतीबरोबर बाजारातील रियल इस्टेटचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे. अन्यथा फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होवू शकते.

FAQs – होम लोनबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न

गृह कर्ज (home loan) कोणत्या बँकेतून घ्यावे?

शक्यतो गृह कर्ज (home loan) हे राष्ट्रीयकृत बँकेतून घ्यावे. तसा पर्याय नसल्यास देशातील खाजगी किंवा कोणत्याही शेड्यूल्ड बँकेतील कर्जाला प्राधान्य द्यावे.

होम लोनसाठी काय करावे लागेल?

वरती लेखात उल्लेख केल्याप्रमाणे आपली गरज, उत्पन्न आणि सध्याची आर्थिक स्थिति पाहूनच जवळच्या शेड्यूल्ड बँकेत होम लोनसाठी चौकशी करावी.

होम लोनसाठी सर्वात कमी व्याजदर कोणत्या बँकेचा आहे?

सहसा बँका सीबील स्कोअर चांगला असेल तर कमीत कमी व्याजदर लावतात. सध्या सर्वच राष्ट्रीयकृत बँकांचे व्याजदर 8-9 टक्क्याच्या दरम्यान आहेत.

होम लोन जास्तीत जास्त किती वर्षासाठी घेता येते?

होम लोन जास्तीत जास्त 30 वर्षासाठी घेता येते. पण त्यासाठी तुमचे कर्ज लवकर सुरू होणे गरजेचे आहे. लवकर कर्ज सुरू झाल्यास पुढची 30 वर्षे कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी मिळू शकतात.

होम लोनसाठी किती उत्पन्न किंवा पगार असायला हवा?

होम लोनसाठी कमीत कमी मागील सहा महिन्यांपासून दोन वर्षापर्यंतचे उत्पन्न चांगले असायला हवे. समजा, तुमचे मासिक उत्पन्न 30000 असेल तर कोणतीही बँक तुम्हाला 20 ते 25 लांखापर्यंत कर्ज देवू शकते.

होम लोनसाठी किती सीबील स्कोअर असायला हवा?

होम लोनसाठी 750+ सीबील स्कोअर उत्तम समजला जातो. तरीही सीबील स्कोअर कमी असल्यास बँका त्यानुसार व्याजदरात वाढ करतात. कमीतकमी 600+ तरी आपला सीबील स्कोअर असायला हवा.

तुम्हाला हेही वाचायला आवडेल > वाहन कर्ज घेताना कोणती काळजी घ्याल?

Leave a Comment