UPI महत्वपूर्ण माहिती- UPI Meaning in Marathi, UPI चा उगम, UPI Benefits, UPI Applications, UPI उदाहरणे, UPI सेवा देणाऱ्या बँकांची यादी, UPI यंत्रणा कशी काम करते? नेहमी विचारले जाणारे प्रश्न इत्यादी.
UPI म्हणजे काय? (UPI Meaning in Marathi)
भारतामध्ये UPI ची सुरुवात कशी झाली? ( How UPI emerged in India)
तुम्हाला माहीत आहे का ?
एखादे UPI ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बँक खाते UPI शी जोडताना किंवा लिंक करताना डेबिट कार्डची माहिती भरूनच UPI सुविधेचा लाभ घेता येत होता. पण एप्रिल 2023 पासून क्रेडिट कार्डच्या सहाय्याने UPI शी लिंक करून व्यवहार करता येवू शकतात. याचाच अर्थ, तुमच्याकडील क्रेडिट कार्ड हे फक्त ऑनलाईन किंवा स्वाइप करण्यापुरते मर्यादित नसून क्रेडिट कार्डने UPI व्यवहार अगदी सहज आणि सुलभतेने शक्य आहे. |
UPI यंत्रणा कशी काम करते?(How UPI Works)
उदा. NPCI चे स्वतःचे BHIM ॲप्लिकेशन आहे. ते डाऊनलोड केल्यानंतर तुमच्या खात्याचे पटकन व्हेरिफिकेशन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्याची माहिती द्यावी लागते. UPI प्रणाली तुमची बँक व खाते प्रणालीमध्ये नोंदणीकृत आहे का ते तपासून ॲप्लिकेशनमध्ये खाते ॲड होते. त्यानंतर UPI PIN तयार करावा लागतो. एकदा UPI PIN तयार झाल्यानंतर किंवा तसा संदेश प्राप्त झाल्यानंतर तुम्ही UPI पेमेंट करण्यासाठी पात्र होता.
उदा. खालील BHIM ॲप्लिकेशन मधील स्क्रीनशॉट पाहा. वेगवेगळ्या पद्धतीने पैसे पाठवण्यासाठी UPI कसे काम करते हे लक्षात येईल.
निवड केल्यानंतर अशी स्क्रीन दिसेल 👇 किती पैसे पाठवायचे ते भरा व खात्री करून send करा. त्यानंतर तुम्हाला 6 अंकी UPI PIN विचारला जाईल. तो टाका. (वेगळ्या बँक खात्याचा UPI PIN वेग-वेगळा असू शकतो).
UPI ची वैशिष्ट्ये (Features of UPI in Marathi)
- वर्षातील 365 दिवस आणि 24 तास कधीही काही सेकंदात पैसे पाठवता येतात.
- सिंगल क्लिक पेमेंट – याचाच अर्थ जास्त पॉप अप स्क्रीनचा उपयोग न होता एका सहा अंकी UPI कोडने पटकन पैसे पाठवता येतात.
- एकाच ॲप्लिकेशनमध्ये अनेक खात्यांचा उपयोग करता येवू शकतो. याचाच अर्थ वेगवेगळ्या बँकेची खाती एका UPI ॲप्लिकेशनमध्ये जोडता येवू शकतात.
- मर्चंट पेमेंटसह QR कोड, आभासी ID चा वापर होत असल्यामुळे पेमेंटमध्ये सुलभता.
- एकाच वेळी बँक, मर्चंट आणि ग्राहकाला एकत्रित आणण्यासाठी कमी वेळेचा वापर.
हेही नक्की वाचा >> रिझर्व्ह बँकेचा नवीन नियम : डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये महत्वाचा बदल
UPI चे फायदे (Benefits of UPI)
वरती उल्लेख केल्याप्रमाणे UPI म्हणजे काय? किंवा UPI Meaning in Marathi काय आहे याची बऱ्यापैकी माहिती घेतली व नेमके UPI काय आहे याचा अंदाज आपल्याला आला. आता UPI चे फायदे काय आहेत किंवा UPI चा वापर करताना त्याच्यामध्ये काय काय सुविधा मिळतात हेच Benefits of UPI च्या माध्यमातून आपण जाणून घेवूयात.
1. Real Time आणि तात्काळ पैसे ट्रान्स्फर करण्याची सोय
समोरच्या व्यक्तीला काही सेकांदामध्ये पैसे पोच झाल्याचे समजते. UPI प्रणालीचा अवलंब करताना Real Time मध्ये पैसे पोहोचले पाहिजेत हा उद्देश आहे आणि UPI ॲप्लिकेशनमधून ते अगदी सहज साध्य होत आहे.
2. छोट्या रकमेसाठी UPI एक वरदान
तुम्ही एखाद्या ATM मध्ये किंवा बँकेत गेल्यावर तुम्हाला दहा रुपये काढता येतील का? किंवा तसे पाठवता येतील का? आणि जरी पाठवता येत असले तरी काही सेकंदात समोरच्या व्यक्तीच्या खात्यात जमा होतील का? नाही. अगदी एक रुपया किंवा अपूर्णांक असलेली रक्कमसुद्धा तुम्हाला अगदी सहज पाठवता येवू शकते.
3. UPI मुळे खात्याची सुरक्षा
UPI मुळे खात्याची सुरक्षा अबाधित राहण्यास मदत होते. पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीला तुमच्या खात्याचे तपशील देण्याची आवश्यकता नाही. एका VPA (Virtual Payment Address) आयडीद्वारे किंवा फक्त नोंदणीकृत मोबाईलद्वारे समोराच्या खात्याचे तपशील तपासले जातात व त्या खात्यांमध्ये पैसे जमा होतात. उदा. Peter0123456@icicibank किंवा मोबाईल नंबर इत्यादी. यामध्ये कोठेही खात्याचा तपशील जाहीर होत नाही ज्यामुळे सुरक्षित व्यवहार करता येवू शकतो.
4. UPI Payment रिक्वेस्ट
कोणालाही UPI Payment रिक्वेस्ट फक्त एका लिंकद्वारे पाठवता येवू शकते. उदा. तुम्ही रेल्वे किंवा बसचे तिकीट काढत आहात, तर तुम्ही त्यांच्या ऑनलाईन डिजिटल पोर्टलवर गेल्यावर तुम्हाला तिकीट बुक करताना UPI ॲप्लिकेशनमध्ये किंवा टेक्स्ट मेसेजमध्ये लिंक पाठवली जाते जी तुमच्याकडून पेमेंटसाठी परवानगी मागते.
5. UPI चे भरपूर पर्याय उपलब्ध
UPI पेमेंट करण्यासाठी फक्त बँकेच्या ॲप्लिकेशनवर अवलंबून राहण्याची गरज नाही. Google Pay, Phone Pay, Paytm सारखे अनेक ॲप्लिकेशन हायटेक तंत्रज्ञाने विकसित झाले आहेत ज्याद्वारे कोठेही पैसे पाठवणे अगदी सहज शक्य आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे बिल UPI पेमेंटने करता येते, जसे की electricty बिल, मोबाइल व टीव्ही रीचार्ज इत्यादी
6. UPI ॲप्लिकेशनमध्येच तक्रार करण्याची सोय
तुम्हाला पेमेंट करताना काही अडथळा निर्माण झाल्यास किंवा पेमेंट अयशस्वी झाल्यास UPI ॲप्लिकेशनमध्येच तुम्हाला तक्रार दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ही वापरकर्त्याच्या बाजूने विचार केल्यास जमेची बाजू म्हणता येईल.
7. UPI कमी खर्चिक आहे
पैसे ट्रान्स्फर करण्याचे इतर पर्याय UPI च्या तुलनेत थोडेसे खर्चिक आहेत. UPI मधून व्यवहार करणे स्वस्त तर आहेच पण डिजिटल व्यवहारामध्ये सर्वात जास्त वेगवान माध्यम म्हणून UPI कडे बघितले जाते.
UPI सध्याची आकडेवारी
UPI सेवा देणाऱ्या बँकांची नावे
UPI Linked Banks | Details |
---|---|
Axis Bank | PSP & Issuer |
Bank Of Baroda | PSP & Issuer |
Bank Of Maharashtra | PSP & Issuer |
Canara Bank | PSP & Issuer |
State Bank Of India | PSP & Issuer |
ICICI Bank | PSP & Issuer |
Central Bank Of India | PSP & Issuer |
Federal Bank | PSP & Issuer |
Kotak Mahindra Bank | PSP & Issuer |
UPI- प्रसिद्ध ॲप्लिकेशन (Best UPI Applications)
FAQs-UPI Frequently Asked Questions- नेहमी विचारले जाणारे प्रश्न
UPI - यूपीआय काय आहे ?
UPI किंवा यूपीआय Unified Payment Interface म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला बँक खात्याची माहिती न घेता काही सेकंदामध्ये पैसे पाठवण्याचा मार्ग किंवा माध्यम आहे
माझी UPI मर्यादा काय आहे?
NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया नुसार UPI मधून एका दिवसाला जास्तीत जास्त 100000 ₹ पाठवता येवू शकतात. याव्यतिरिक्त आपण वापरत असलेल्या प्रणालीची स्वतःची काही मर्यादा असल्यास ती तुम्हाला लागू होईल.
UPI आयडी कोड काय आहे?
UPI आयडी कोड किंवा UPI ID हा तुम्ही पेमेंट करण्यासाठी एक आभासी कोड तयार करू शकता जेणेकरून तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती शेअर करायची गरज नाही. इतर व्यवहारामध्ये उदा. NEFT/RTGS मध्ये तुम्हाला तुमचा बँक खाते नंबर, IFSC कोड इत्यादी गोष्टी शेअर कराव्या लागतात. UPI मध्ये UPI आयडी कोड शेअर केला तरी पेमेंट पाठवता येते. उदा abc@okicici
UPI PIN कसा रिसेट करायचा?
UPI PIN डेबिट कार्डच्या सहाय्याने रिसेट करता येवू शकतो. सर्व UPI Apps मध्ये ती सुविधा उपलब्ध असते.
UPI व्यवहार म्हणजे काय?
UPI व्यवहार म्हणजे तुम्ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला UPI च्या माध्यमातून पैसे पाठवणे होय. यामध्ये QR स्कॅन करणे, UPI ID ला पैसे पाठवणे, UPI लिंकला क्लिक करून पैसे पाठवणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
UPI व्यवहार फक्त बँकिंग कामकाजा दिवशीच होतात का?
नाही. UPI व्यवहार 24 तास कधीही होवू शकतात. सुट्टीच्या दिवसाचे किंवा रात्रीचे UPI व्यवहार करण्यास बंधन नाही.
UPI ला क्रेडिट कार्ड जोडता किंवा लिंक करता येते का?
हो. यापूर्वी UPI व्यवहार डेबिट कार्डनेच लिंक केलेले असायचे. 2023 पासून RBI ने क्रेडिट कार्डला जोडण्यास परवानगी दिली . याचाच अर्थ UPI व्यवहार करण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डची नोंदणी करता येते. समजा तुमच्याकडे फक्त क्रेडिट कार्ड उपलब्ध असेल, तर UPI नोंदणी करताना तुम्ही क्रेडिट कार्ड माहिती भरून UPI PIN तयार करू शकता.