पंतप्रधान विश्वकर्मा योजना: PM Vishwakarma Scheme in Marathi, संपूर्ण माहिती, पात्रता, फायदे, कागदपत्रे, व्यवसायांची यादी, निष्कर्ष इत्यादी माहिती.
पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागिरांना प्रोत्साहन देणारी योजना असून चांगले कौशल्य असणाऱ्या कारागिरांना याचा फायदा होणार आहे. अर्थव्यवस्थेमध्ये अनेक हाथ मोलाचे योगदान देत असतात. सहसा, संघटित वर्गाला याचा फायदा मिळतो. पण असंघटित असलेला वर्ग मात्र अनेक लाभापासून वंचित राहतो. त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असते म्हणूनच असे कारागीर जे स्वतःच्या कौशल्याला वाव देऊ इच्छितात त्यांना आर्थिक सहाय्य तातडीचे मिळावे म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केली आहे.
पंतप्रधान विश्वकर्मा योजना: काय आहे ही योजना?
पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही विस्तारित स्वरूपात पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना असून अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यापूर्वीच 2023-24 अर्थसंकल्पात याची घोषणा केली होती.
देशात अनेक पारंपरिक उद्योग आहेत ज्यामध्ये अनेक कारागीर काम करत असतात. अगदी मुर्तिकारापासून लोखंडी हत्यार बनवणाऱ्या लोहारापर्यंत अनेकांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. पण त्यांना हवे तसे प्रोत्साहन मिळत नाही किंवा त्याचा राष्ट्रीय आणि जागतिक बाजारपेठेशी संबंध येत नाही. अशा कारागिरांना आर्थिक पाठबळ देऊन अर्थव्यवस्थेशी जोडणे आणि त्यांचे पारंपरिक कौशल्य टिकवून ठेवणे हे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- ही योजना 16 ऑगस्ट 2023 पासून संपूर्ण देशात लागू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला.
- ही योजना विश्वकर्मा जयंती म्हणजेच 17 सप्टेंबर 2023 पासून अधिकृतरित्या सुरू होणार असून सरकारने 13000 कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करून ठेवली आहे.
- कारागिरांना त्यांच्या व्यवसायासाठी सुरुवातीस 1 लाखापर्यंत कर्ज मिळेल (5% व्याज). कर्ज व्यवस्थित फेडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 2 लाखापर्यंत 5 % व्याजाने पुन्हा कर्ज मिळु शकणार आहे.
- पंतप्रधान विश्वकर्मा योजनेतंर्गत कारागिरांना कौशल्य विकास प्रशिक्षण मिळणार आहे. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या कारागिरांना पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना दररोज 500 रुपये मानधन देणार आहे.
- तसेच या योजनेतंर्गत कारागिरांना साहित्य घेण्यासाठी सुरुवातीस 15000 रुपयाची आर्थिक सहाय्य स्वरूपात तरतूद करण्यात आली आहे.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या कारागिरांना विशेष ओळखपत्र आणि प्रमाणपत्रसुद्धा मिळणार आहे.
- 18 पारंपरिक व्यवसायांना लाभ मिळणार असून कारागिरांचे कौशल्य टिकवून ठेवण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजना (पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना) काम करणार आहे.
पंतप्रधान विश्वकर्मा योजना: पात्रता
- भारतीय नागरिक असणे गरजेचे.
- योजनेमध्ये पात्र असलेल्या व्यवसायामध्ये कारागीर असावा.
पंतप्रधान विश्वकर्मा योजना: कागदपत्रे
- आधार कार्ड
- निवडणूक मतदार ओळखपत्र (Voter ID)
- व्यवसाय करत असल्याचा पुरावा किंवा व्यवसाय नोंदणी केलेले प्रमाणपत्र
- बँकमध्ये खाते असलेला पुरावा किंवा सबसीडी पात्र कोणत्याही बँकेचे खाते
- उत्पन्नाचा दाखला किंवा प्रमाणपत्र
- गरज वाटल्यास जातीचे प्रमाणपत्र
पंतप्रधान विश्वकर्मा योजना: कोणते व्यवसाय पात्र आहेत?
- सुतार
- सोनार
- कुंभार
- धोबी
- शिंपी
- चांभार
- गवंडी
- विणकर/चटई/झाडू बनविणारे, दोऱ्या वळणारे /बेलदार
- पारंपारिक खेळणी बनविणारे
- शिल्पकार/मूर्तिकार
- नाभिक
- हार तयार करणारे
- मासेमारीचे जाळे बनवणारा
- होड्या बांधणारे
- चिलखत तयार करणारा
- लोहार
- कुलूप तयार करणारे
- कुऱ्हाड आणि इतर लोखंडी हत्यार बनविणारे
पंतप्रधान विश्वकर्मा योजना: फायदे
कारागिरांना या योजनेमध्ये अनेक फायदे मिळणार असून पारंपरिक व्यवसायाचे जतन, कौशल्य विकासाबरोबर आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. काही महत्वपूर्ण फायदे खालीलप्रमाणे;
1. सुरुवातीस 100000 पर्यंत कर्ज 5% व्याज |
---|
2. वेळेत कर्ज फेडल्यास आणखी 200000 कर्ज 5 % व्याज |
3. कौशल्य विकास प्रशिक्षण व प्रशिक्षण काळात दररोज 500 रुपये मानधन |
4. व्यवसाय साहित्य खरेदीसाठी 15000 रुपये मिळणार |
5. ओळखपत्र आणि प्रमाणपत्र मिळणार |
निष्कर्ष
आपल्या देशात अनेक असे कौशल्य असलेले कारागीर आहेत जे स्थानिक बाजारपेठेत वर्चस्व राखून आहेत. दुर्दैवाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांना म्हणावे तसे स्थान मिळालेले नाही. संघटित असो किंवा असंघटित, कारागीर आणि त्यांचे कौशल्य राहिले तरच भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा टिकवून ठेवता येईल. पंतप्रधान विश्वकर्मा योजना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच आहे असे त्या योजनेचे वैशिष्ट्य सांगते. देशभरातील प्रत्येक कारागिराने त्याचा लाभ घेणे उचित ठरेल.
हेही नक्की वाचा >> NPS: एनपीएस योजना म्हणजे काय?