गोल्ड ETFs म्हणजे काय?
गोल्ड ETF आपल्याला सोन्याचे दर डिजिटल स्वरूपात गुंतवणूक करण्याचे पर्याय देतात. हल्ली सोन्याची थेट खरेदी करणे हे अनेकजणांना धोक्याचे वाटते. म्हणजेच अनेकांना असुरक्षित वाटते. प्रत्यक्ष सोन्याची खरेदी करून ते घरी किंवा बँकेत ठेवणे आणि त्याची काळजी घेणे हे खर्चिक असते. गुंतवणुकीच्या बाजूने विचार करायचा झाल्यास, सोने खरेदीचे पर्याय आणि माध्यमे सुरुवातीपासूनच मर्यादित आहे. भारतात सोने खरेदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सराफ पेढी किंवा अगदी स्थानिक सोन्याच्या दुकानातून सोने खरेदी केली जाते. आता मात्र वरती उल्लेख केल्याप्रमाणे ऑनलाईन डिजिटल स्वरूपात सोने खरेदी करता येतात ज्याला Gold ETF- गोल्ड ETF(Gold Exchange Traded Funds) म्हणतात.
गोल्ड ETF कसे काम करते?
गोल्ड ETF मधील गुंतवणुकीची आकडेवारी
गोल्ड ETF चे फायदे
- भौतिक सोने खरेदीला चांगला पर्याय. सहसा सोने खरेदी केल्यानंतर देखभाल आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी थेट ग्राहकांवर असल्यामुळे प्रत्यक्ष सोने खरेदीपेक्षा डिजिटल गोल्ड ETF खरेदी जास्त सुरक्षित आहे असे आपण म्हणू शकतो.
- वर्षानुवर्षे गोल्ड ETF मध्ये खरेदी केलेल्या सोन्याचा घसारा पकडण्याचे काही कारणं नाही. शुद्धता अबाधित असते आणि चालू बाजारातील दर जसेच्या तसे लागू होतात. हे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
- गोल्ड ETF मधील सोने युनिट नुसार विकता येते. भौतिक खरेदी केलेल्या सोन्यामध्ये आपला पूर्ण दागिना विकावा लागतो. तुकड्यांमध्ये विकण्याचे पर्याय खूप कमी आणि वेळखावू असतात. गोल्ड ETF मधील सोन्याचे डिजिटल विक्री करण्याचे स्वरूप अगदी सहज, सोपे आणि कमी खर्चिक आहे.
काही प्रसिध्द गोल्ड ETF फंडस्
निष्कर्ष
पारंपरिक सोन्यातील प्रत्यक्ष गुंतवणुकीचा पर्याय हा भौतिक सोन्याचे अस्तित्व दाखवण्यासाठी आकर्षक आणि लोभस वाटत असला तरी अलीकडे डिजिटल स्वरूपात सोन्यात गुंतवणूक करण्याचे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. सोन्याचे बाजारातील दर प्रतिबिंबित होत असल्यामुळे आपण सोन्याची खरेदी विक्री डिजिटल स्वरूपात करू शकतो त्यामुळेच गोल्ड ETF कडे आपण एक गुंतवणूकीचा भाग म्हणून पहावयास हरकत नाही. अर्थात, अनेक तज्ञांच्या मते एकूण गुंतवणुकीपैकी 5 – 10 टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक सोन्यामध्ये अपेक्षित नाही.
हेही नक्की वाचा >> Regular आणि Direct म्युच्युअल फंड म्हणजे काय ?