गेली तीन दिवस मुंबईच्या बीकेसी येथे सुरू असलेली ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023 (Global Fintech Fest 2023) जगातील तंत्रज्ञानाशी संबंधित नावीन्यपूर्ण उपक्रमांचा खजिना घेऊन आली होती. कॉर्पोरेट क्षेत्रातील विषेतः बँकिंग विश्वातील नवीन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023 (Global Fintech Fest 2023) मध्ये भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उपस्थिती दर्शवताना भारताने फिनटेकच्या सहाय्याने कशी प्रगती केली याचे वर्णन केले. गुंतवणुकीसाठी वेगवान माध्यमे तयार झाली असल्यामुळे ऑनलाईन डिजिटल व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचेसुद्धा त्यांनी आवर्जून सांगितले.
छायाचित्र स्त्रोत: globalfintechfest.com
या फेस्टसाठी व नियोजन करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सरकारी संस्थांचे सहकार्य लाभले त्यापैकी काही खालीलप्रमाणे;
1. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार
2. अर्थ मंत्रालय, भारत सरकार
3. भारतीय रिझर्व्ह बँक
4. IFSCA – आतंरराष्ट्रीय वित्तिय सेवा केंद्रे
तर ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023 (Global Fintech Fest 2023) चे नियोजन करण्यासाठी स्पॉन्सर संस्था या आहेत.
NPCI म्हणजेच National Payments Corporation of India
Payments Council of India (PCI)
Fintech Convergence Council (FCC)
ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023 (Global Fintech Fest 2023)- theme- थीम
जबाबदार आर्थिक इको व्यवस्थेसाठी वैश्विक सहयोग
सर्वसमावेशकता l लवचिकता l शाश्वत
|
ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023 (Global Fintech Fest 2023)- सहयोगी भागीदार
सहयोगी भागीदार या नात्याने अनेक कंपन्यांनी व संस्थांनी ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023 साठी नोंदणी करण्यापासून पेमेंट गेटवे उपलब्ध करून देण्यापर्यंत चांगले सहकार्य केले व पार्टनर म्हणून सहकार्य केले.
छायाचित्र स्त्रोत: globalfintechfest.com
ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023 (Global Fintech Fest 2023) : चर्चिले गेलेले काही महत्वपूर्ण विषय
ई- रुपया
ई रुपया हे रोखीला पर्याय म्हणून बाजारात आले असले तरी त्याचा मुख्य उद्देश आभासी चलनाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आहे. देशाचे एक स्वतःचे डिजिटल चलन असावे असे रिझर्व्ह बँकेने काही महिन्यापूर्वीच म्हंटले होते आणि ते ई रुपया डिजिटल स्वरूपात अस्तित्वात देखील आले. इतकेच काय, तब्बल 13 बँकांनी याची अमलबजावणी केली असून जवळपास 10 लाखाहून अधिक लोक ई रुपयाचा वापर करत आहेत. रिझर्व्ह बँकेकडून ई चलन बँकांना अनुमती देते व त्यानंतरच ते बँकांच्या ग्राहकापर्यंत पोहचते. त्यामुळे त्याची पडताळणी योग्य पद्धतीने होते असे म्हणायला हरकत नाही. आता इथून पुढे ई रुपयाला क्यू आर कोडला जोडल्यास नवल वाटणार नाही असे रिझर्व्ह बँकेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023 (Global Fintech Fest 2023) मध्ये हजेरी लावताना सांगितले.
डिजिटल शिक्षण
ग्रामीण भारत आजदेखील डिजिटल शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात नाही. एकूण जीडीपीच्या 18% जीडीपी हा शेती आधारित म्हणजेच कृषी क्षेत्रातून येत असूनसुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब तितकासा चांगला नाही. त्यासाठी फिनटेक आणि कृषी तंत्रज्ञान याचा योग्य मेळ घालण्यासाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे यावर फिनटेक परिषदेमध्ये चर्चा झाली.
वित्तीय समावेश
वित्तीय समावेश करण्यासाठी फिनटेक महत्वाची भूमिका बजावेल असेही परिषदेमध्ये अनेक तज्ञ पाहुण्यांनी सांगितले. स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, इन्कम टॅक्स, बँकिंगची एकमेकाला सांगड घालत वित्तीय समावेशाला प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागातसुद्धा तंत्रज्ञान पोहोचले पाहिजे असे मत अनेकांनी व्यक्त केले.